Join us
Daily Top 2Weekly Top 5

संपादित जमिनी सिडकोच्या नावे

By admin | Updated: June 30, 2014 23:01 IST

नवी मुंबईतील संपूर्ण जमिनीची मालकी सिडकोकडे आहे.

कमलाकर कांबळे - नवी मुंबई
नवी मुंबईतील संपूर्ण जमिनीची मालकी सिडकोकडे आहे. या मालकी हक्काला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी संपादित केलेल्या सर्व जमिनीच्या सातबा:यांवर आपल्या नावाची नोंद करण्याची प्रक्रिया सिडकोने जवळजवळ पूर्ण केली आहे. त्यामुळे जवळपास 17 हजार हेक्टर जागेच्या मालकी हक्कावर सिडकोची अधिकृत मोहर लागणार आहे.
नवी मुंबईची उभारणी करण्यासाठी राज्य शासनाने सिडको महामंडळाची स्थापना केली. त्यानुसार सिडकोने ठाणो, पनवेल आणि उरण तालुक्यातील  343.7 चौरस किलोमीटरचा भूभाग संपादित केला. शासकीय धोरणानुसार सिडकोने मूळ जमीन मालकाला संपादित केलेल्या जमिनीचा मोबदलाही दिला आहे. त्यानुसार संपादित केलेल्या सर्व जमिनीचा मालकी हक्क सिडकोला प्राप्त झाला आहे. असे असले तरी या मालकी हक्काला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी संपादित जमिनीच्या सातबा:यावर सिडकोचे नाव येणो गरजेचे होते. चाळीस वर्षात सिडकोकडून या दृष्टीने कोणतेही प्रयत्न झाले नव्हते. सिडकोने संपादित केलेल्या वन आणि शासकीय जमिनीच्या सातबा:यांवर सिडकोचे नाव पडले आहे. मात्र संपादित केलेल्या शेतीच्या 17 हजार हेक्टर जागेच्या सातबा:यांवर आतार्पयत मूळ शेतक:यांचेच नाव होते.  त्यामुळे या सर्व जागांच्या सातबा:यांवर सिडकोचे नाव टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडकोचे  व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया आणि सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही.राधा यांनी गेल्या वर्षी घेतला होता. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली होती. 
 
लॅण्ड बँकेची निर्मिती
संपादित जमिनीच्या सातबा:यावर सिडकोचे नाव टाकण्यासाठी जिल्हाधिका:यांकडून सर्व जमिनींचे सातबारा व इतर आवश्यक तपशील मागविण्यात आला होता. जिल्हाधिका:यांकडून प्राप्त झालेल्या दस्तऐवजावरून संपादित व असंपादित जमिनीचे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यावरून सिडकोकडे आणखी मोठय़ाप्रमाणात जमीन शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले आहे.