मनोहर कुंभेजकर ल्ल मुंबईमुंबईतील समुद्र आणि तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यामुळे जलचरांवर दुष्परिणाम होतात. यावर उपाय म्हणून न्यू दिंडोशी गार्डन हिल सोसायटीने आपल्या गणेशमूर्तीचे सोसायटीच्या आवारातच इकोफ्रेंडली विसर्जन केले आहे.गोरेगाव (पूर्व) येथील नागरी निवारामधील १ आणि २ च्या मागील बाजूस असलेल्या म्हाडाच्या इमारत क्रमांक १९ च्या आवारात न्यू दिंडोशी गार्डन हिल को-आॅप. सोसायटीने ड्रम ठेवला. या ड्रममध्ये पाणी सोडून त्यात सोसायटीमधील शाडूच्या सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले. त्यानंतर ड्रममधील पाणी येथील झाडांकरिता वापरले. इकोफ्रेंडली विसर्जनाची संकल्पना सोसायटीचे सचिव युवराज गायकवाड यांची आहे. सोसायटीचे अध्यक्ष रणजित कदम आणि समितीच्या सर्व सदस्यांनी त्याला मान्यता दिली आहे. यापूर्वी आरे येथील तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन केले जात होते.
सोसायटीचे इकोफ्रेंडली गणपती विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2016 04:52 IST