Join us  

राजभवनात झळकणार आदिवासी बंधुंचे पर्यावरणस्नेही 'आकाश कंदील' 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 10:49 PM

दिवाळीनिमित्त राजभवन परिसरात आज एका रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपालांनी स्पर्धकांच्या कलाकृती पाहिल्या व विजेत्या स्पर्धकांना कौतुकाची थाप दिली.

ठळक मुद्देदिवाळीनिमित्त राजभवन परिसरात आज एका रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपालांनी स्पर्धकांच्या कलाकृती पाहिल्या व विजेत्या स्पर्धकांना कौतुकाची थाप दिली.

मुंबई - दीपावलीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज राजभवनातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना आदिवासी भगिनींनी तयार केलेले आकाश कंदील तसेच मिठाईचे वाटप केले. पालघर जिल्ह्यातील आदिवासी भगिनींनी बांबूपासून हे पर्यावरण-स्नेही आकाश कंदील तयार केले असून ‘सेवा विवेक’ (विवेक ग्रामविकास केंद्र) या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राजभवन येथे पाठविण्यात आले. गेल्या वर्षी देखील राजभवनाकडून येथील आकाश कंदील घेण्यात आले होते.

दिवाळीनिमित्त राजभवन परिसरात आज एका रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपालांनी स्पर्धकांच्या कलाकृती पाहिल्या व विजेत्या स्पर्धकांना कौतुकाची थाप दिली. यावेळी राजभवनात कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय, श्रमिक तसेच पोलीस दलातील जवान उपस्थित होते. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, उपसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :दिवाळी 2021भगत सिंह कोश्यारीमुंबई