Join us

विमानतळांवर ईबोला तपासणी यंत्र

By admin | Updated: October 17, 2014 01:43 IST

परदेशातून येणा:या नागरिकांमधून ईबोला रुग्ण शोधणारे यंत्र देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर बसवले असल्याची माहिती केंद्र सरकारने उच्च न्यायालयात दिली आह़े

मुंबई :  परदेशातून येणा:या नागरिकांमधून ईबोला रुग्ण शोधणारे यंत्र देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर बसवले असल्याची माहिती केंद्र सरकारने उच्च न्यायालयात दिली आह़े
महत्त्वाचे म्हणजे पुणो व नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे यंत्र बसवले गेले नव्हत़े न्यायालयाने कान उपटल्यानंतर आता या दोन्ही विमानतळांवरदेखील हे यंत्र बसवले गेले आह़े तसेच या यंत्रद्वारे एखाद्या प्रवाशाला ईबोलाची बाधा असल्याचे स्पष्ट झाल्यास त्यावर तत्काळ उपचार केले जातात, असे केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितल़े
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी जनहित याचिका केली होती़ ईबोलाने परदेशात थैमान घातले आह़े याची बाधा भारतात होऊ नये यासाठी न्यायालयानेच केंद्र व राज्य शासनाला योग्य त्या उपाय योजना करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी तिरोडकर यांनी केली होती़ या याचिकेवरील सुनावणीत केंद्र व राज्य शासनाने ईबोला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा पाढा न्यायालयासमोर वाचला़ मात्र पुणो व नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ईबोला यंत्र बसवले नसल्याचे तिरोडकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणल़े (प्रतिनिधी)
 
संतप्त झालेल्या न्यायालयाने केंद्र शासनाचे चांगलेच कान उपटल़े त्यानंतर केंद्र शासनाने या दोन विमानतळांसह सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर हे यंत्र बसवल्याची माहिती न्यायालयालया दिली़ ते ग्राह्य धरत न्यायालयाने तिरोडकर यांची याचिका निकाली काढली़