Join us

ईस्टर्न....वॉर्डबॉयकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By admin | Updated: December 3, 2014 22:35 IST

वॉर्डबॉयकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

वॉर्डबॉयकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
विक्रोळी: उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीचा रुग्णालयातीलच वॉर्डबॉयने विनयभंग केल्याची घटना आज विक्रोळी येथे घडली. मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारी नंतर पोलिसांनी वॉर्डबॉयला अटक केली आहे.
विक्रोळीच्या टागोर नगर येथे राहणार्‍या या १४ वर्षीय पीडित मुलीला अनेक दिवसांपासून ताप येत असल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला याच परिसातील मोदी रुग्णालयात दाखल केले. त्यानुसार या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातील वॉर्डबॉय अजिंक्य गमरे (२१) याने या मुलीसोबत अश्लील वर्तन केले. त्यामुळे आज मला घरी जायचे आहे. असा ह˜ या मुलीने कुटुंबियांकडे केला. तिच्या कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी तिला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली. त्यानुसार तिने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबियांनी तत्काळ ही बाब रुग्णालय प्रशासनाच्या कानावर घालत विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला आज सकाळी अटक केली आहे. (प्रतिनिधी)