ईस्टर्न....मुलुंडमध्ये वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
मुलुंडमध्ये वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
ईस्टर्न....मुलुंडमध्ये वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
मुलुंडमध्ये वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमीमुलुंड: मुलुंडमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत एक २२ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी अज्ञात कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय अविनाश खेडेकर (२२) असे जखमी तरुणाचे नाव असून मुलुंड पूर्वेकडील सावरकर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अक्षय हा नानेपाडा येथे राहण्यास असून मंगळवारी रात्री स्टेशनकडे जात असताना साईनाथ जंक्शन येथे पाठीमागून धडकलेल्या मारुती कारच्या धडकेत त्याचा अपघात झाला. पोलीस आणि स्थानिकांंच्या मदतीने अक्षयला तत्काळ सावरकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मारुती चालक मात्र फरार झाला. या अपघातात अक्षयची प्रकृती चिंताजनक असून अज्ञात मारुती चालकाविरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)