Join us
Daily Top 2Weekly Top 5

ईस्टर्न....किंंवा हॅलो...लग्नास नकार दिल्याने विनयभंग

By admin | Updated: September 1, 2014 22:45 IST


ईस्टर्न....किंवा हॅलो

लग्नास नकार दिल्याने
तरुणीचा विनयभंग

भांडुप : एका २१ वर्षीय तरुणीने लग्नास नकार दिला म्हणून तिला मारहाण करीत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी प्रशांत प्रकाश राणे (२५) याचा भांडुप पोलीस शोध घेत आहेत.
प्रशांत भांडुप टेंभीपाडा पाइपलाइन परिसरात राहण्यास होता. त्याच परिसरात राहणार्‍या तक्रारदार तरुणीशी त्याचे एकतर्फी प्रेम होते. शनिवारी घरात कुणीही नसताना त्याने तिला लग्नाची मागणी घातली. लग्नास नकार दिल्यामुळे तरुणीला मारहाण करून त्याने पळ काढला. याप्रकरणी सुरुवातीला भांडुप पोलीस ठाण्यात १५१(३) अंतर्गत अदखलपात्र गुन्‘ाची नोंद करण्यात आली होती. रविवारी मुलीच्या तक्रारीवरून प्रशांतवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत चव्हाण यांनी दिली. सगळे प्रकरण पोलिसांत गेल्यानंतर प्रशांतने राहत्या घरातून पळ काढला. आता प्रशांत चव्हाणचा शोध पोलीस घेत आहेत. (प्रतिनिधी)