Join us

ईस्टर्न...फेरीवाल्यांकडून खंडणी मागणारे दोघे अटकेत

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

फेरीवाल्यांकडून खंडणी मागणारे दोघे अटकेत

फेरीवाल्यांकडून खंडणी मागणारे दोघे अटकेत
सेनेची महिला संघटक फरार
कुर्ला : येथे काही फेरीवाल्यांकडून खंडणी मागणार्‍या तीन जणांविरोधात नेहरू नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत यातील दोघांना अटक केली आहे. तर यामध्ये सेनेची महिला संघटक म्हणून काम करणारी फरिदा शेख ही फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
कुर्ल्यातील साबळे नगर येथे रामकुमार चौधर्री यांचा कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय आहे. याच परिसरात राहणारा अब्दुल कादर शेख ऊर्फ बटल्या (३२) आणि फरिदा शेखने रामकुमार चौधरी यांच्याकडे १० हजार रुपये खंडणी मागितली होती. तसेच पैसे न दिल्यास व्यवसाय करू देणार नाही, अशी धमकीदेखील त्यांच्याकडून देण्यात आली होती. शिवाय फरिदा ही शिवसेनेची उपविभाग संघटक असल्याने तिने पालिका अधिकार्‍यांची धमकी देत दुकान पाडण्याचीही धमकी चौधरी यांना दिली. त्यामुळे घाबरलेल्या रामकुमार यांनी चार दिवसांपूवी नेहरू नगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करत, यातील अब्दुलला सोमवारी अटक केली. तर फरिदाला याबाबत माहिती मिळताच ती पसार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
अशाच प्रकारे कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ व्यवसाय करणार्‍या एका फेरीवाल्याकडून अब्दुलचा मोठा भाऊ मोहम्मद कादर शेखनेदेखील खंडणी मागितली. या फेरीवाल्याने नेहरू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (प्रतिनिधी)