Join us
Daily Top 2Weekly Top 5

ईस्टर्न....अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका

By admin | Updated: August 28, 2014 20:55 IST

ईस्टर्नसाठी.....

ईस्टर्नसाठी.....
अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका, आरोपीचा शोध सुरु
मुलुंड: अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करण्यास मुलुंड पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी आरोपी अश्विन भगवान चव्हाण (२३) आणि आई हंसाबेन चव्हाण (५०) या दोघांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करत त्यांंचा शोध मुलुंड पोलिस घेत आहे.
तक्रारदार १७ वर्षीय मुलगी मुलुंड बीएमसी वसाहतीत कुटुंबियांसमवेत राहण्यास आहे. रविवारी सायंकाळी सहापासून घराबाहेर पडलेली मुलगी उशीरानेही घरी न परतल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी रात्री उशीरा मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करुन मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गायब असलेली मुलगी अश्विन आणि त्याची आई हंसाबेनसोबत गुजरात येथील जुनागड परिसरात असल्याचे समोर आले. पोलिसांंचे एक पथक तेथे रवाना होणार तोपर्यंत बुधवारी हंसाबेनने मुलीला मुलुंड पोलिस रेल्वेस्थानकात सोडून पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी लगेचच पीडित मुलीला ताब्यात घेतले.
अश्विनने तक्रारदार मुलीला लग्नाचे आमिष दाखवून गुजरात येथे नेले होते. मात्र, ही मुलगी अल्पवयीन असल्याने तिला पुन्हा मुलुंडला सोडून आरोपी मायलेक पसार झाले. घरातून जाताना मुलीने स्वत:सोबत लग्नासाठी आधार कार्डही नेले होते. याप्रकरणी अश्विन आणि त्याची आई हंसाबेन या दोघांवरही अपहरणाचा गुन्हा दाखल करत त्यांंचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)