Join us
Daily Top 2Weekly Top 5

ईस्टर्नसाठी.....चेंबूरमध्ये राष्ट्रवादीचा रास्ता रोको

By admin | Updated: August 27, 2014 21:30 IST

(मेलवर फोटो आहेत...)

(मेलवर फोटो आहेत...)

चेंबूरमध्ये राष्ट्रवादीचा रास्ता रोको

चेंबूर: सायन-पनवेल मार्गावरील सुमन नगर येथे बांधण्यात आलेल्या पुलाला शाहीर आण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चेंबूरमध्ये रास्ता रोको केला. त्यामुळे १० ते १५ मिनिटे यामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
चेंबूरवरुन दक्षिण मुंबईत जाण्यासाठी पूर्वी सायन-पनवेल हा एकच मार्ग असल्याने सुमन नगर जंक्शनवर मोठी वाहतूक कोंडी होत होती. वाहतुकीची ही समस्या सोडवण्यासाठी तीन वर्षांपूर्वी याठिकाणी एक उड्डाणपुल बांधण्यात आला. हा उड्डाणपुल आण्णाभाऊ साठे उद्यानातूनच जात असल्याने अनेकांनी या उड्डाणपुलास विरोध दर्शवला. मात्र, लोकांचा विरोध मोडीत काढत याठिकाणी हा उड्डाणपुल सुरु करण्यात आला.
उड्डाणपुल सुरु होण्यापूर्वी येथील स्थानिक रहिवाशांनी या उड्डाणपुलाला शाहीर आण्णाभाऊ साठे उड्डाणपुल असे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली होती. यासाठी अनेकदा आंदोलने देखील करण्यात आली. यावर शासनाने या उड्डाणपुलाला आण्णाभाऊ साठेंचेच नाव देण्याचे आश्वासन दिले. मात्र, गेल्या तीन वर्षांत शासनाने हा उड्डाणपुल नामकरणाविनाच ठेवला आहे. अखेर काही रहिवाशांनी स्वत:हून या उड्डाणपुलावर आण्णाभाऊ साठेंचे नाव लिहिले आहे. मात्र, शासनाने अद्याप या उड्डाणपुलाला आण्णाभाऊंचे नाव अधिकृतरित्या दिलेले नाही. त्यामुळे या मागणीसाठी चेंबूरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सायन-पनवेल मार्गावर रास्ता रोको करत जोरदार आंदोलन केले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी गाड्या अडवण्याचा देखील प्रयत्न केला. त्यामुळे काही वेळ पोलिसांना या मार्गावरील वाहतूक वळवावी लागली होती. (प्रतिनिधी)