Join us

ई निविदेवरून गदारोळ

By admin | Updated: September 20, 2014 01:36 IST

ई निविदेच्या घोटाळ्याप्रकरणी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी विरोधी पक्षांनी आज आक्रमक भूमिका घेतली़

मुंबई : ई निविदेच्या घोटाळ्याप्रकरणी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी विरोधी पक्षांनी आज आक्रमक भूमिका घेतली़ मात्र आयुक्त सीताराम कुंटे गैरहजर असल्याने कोणतीही चर्चा न करता पालिकेची महासभा झटपट तहकूब करण्यात आली़ त्यामुळे आयुक्तांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी करीत विरोधी पक्षांनी आपला संताप व्यक्त केला़
ई निविदेत पद्धतीत शंभर कोटींचा घोटाळा झाल्याचा अहवाल टावोने दिला आह़े मात्र घोटाळ्यास आयुक्तही जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी पालिकेच्या महासभेत आज केला़ दोषी अभियंत्यांचे निलंबन, ठेकेदारांना काळ्या यादीत व ई निविदा पद्धत बंद करून पालिकेतील ए़बी़एम. सॉफ्टवेअर कंपनीची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली़
आयुक्तांना सभागृहात बोलाविण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली़ परंतु आयुक्त मंत्रलयात गेल्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. आयुक्त हाय हाय, मुंबईकरांच्या पैशांचा हिशेब द्या, अशी निदर्शने सुरू झाली़ त्यामुळे आयुक्त हजर होत नाही, तोर्पयत सभा चालविण्यात येणार नाही, असा इशारा देऊन महापौर स्नेहल आंबेकर यांनी बैठक गुंडाळली़ (प्रतिनिधी)
 
च्विरोधी पक्षांनी हा घोटाळा बाहेर काढल्यानंतर स्थायी समितीमध्ये हरकतीचा मुद्दा घेण्याचे सोपस्कार सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीने केल़े मात्र विरोधी पक्षांनी सभागृहात आज आक्रमक भूमिका घेताच सत्ताधा:यांनी याप्रकरणी सावध भूमिका घेतली़ 
च्विरोधकांच्या समर्थनार्थ सत्ताधारी सभागृहात उभे राहिल़े मात्र आयुक्तांविरोधात निदर्शने अथवा त्यात सहभाग होण्याचे सत्ताधा:यांनी टाळल़े
 
आयुक्तांच्या गैरहजेरीमुळे सभागृह गुंडाळण्यात आल्यामुळे विरोधकांनी थेट आयुक्तांचे कार्यालय गाठल़े चोरो के चोर आयुक्त हे महाचोर, हाय हाय आयुक्त अशा घोषणा देत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेच्या नगरसेवकांनी उपायुक्त सुधीर नाईक यांना भेटण्याचा प्रयत्न केला़ मात्र आयुक्त मंत्रलयात असल्याचे समजताच त्यांच्या दालनाबाहेर नारळ फोडून विरोधकांनी आपला राग शांत केला़ 
 
च्माजी महापौर सुनील प्रभू यांच्या पावलांवर पावलं ठेवत स्नेहल आंबेकर यांनीही सभागृह उशिरा चालविण्याची प्रथा सुरू ठेवली आह़े आज सभागृह तब्बल एक तास विलंबाने सुरु करण्यात आल़े 
 
च्पण महापौरपद नवीन असल्यामुळे भांबावलेल्या महापौरांचा विरोधकांना थोपविताना गोंधळ उडत होता़ अधूनमधून माजी महापौर सुनील प्रभू त्यांना सूचना करीत होत़े तरीही या गोंधळातच त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांचे नामकरण प्रकाश आंबेडकर असे करीत सर्वानाच बुचकळ्यात टाकल़े
 
च्आयुक्त मंत्रलयात गेल्यामुळे विरोधी 
पक्षांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू 
केली. आयुक्त हाय 
हाय, मुंबईकरांच्या 
पैशांचा हिशेब द्या, अशी 
निदर्शने सुरू झाली़