पंकज राऊत, बोईसरपालघर जिल्ह्यातील जिल्हापरिषदेच्या काही शाळांमधील इयत्ता चौथीच्या मुलांना कठीण शब्द वाचता येत नाही ती मुले तुटकपणे वाचतात तर जोडशब्द वाचताच येत नाहीत. इयत्ता पाचवी पर्यंतचे शिक्षण असे झाले तर पुढे भविष्यात तो विद्यार्थी शिक्षणात काय व कसा प्रगती करेल अशी खंत पालघर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पालघर जिल्हा पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापात व्यक्त करून प्राथमिक शाळांमधील शिक्षणाचा स्तर उंचावण्याकरीता कठोर उपाययोजना कणखरपणे राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रावरील मरगळ दूर करण्यासाठी मॉनीटरींग सिस्टीम तयार करण्यात येत असून जेणेकरून पर्यवेक्षक यंत्रणेचा खालपर्यंत इफेक्ट पडेल सध्या शिक्षणामध्ये मॉनीटरींग फार कमी आहे. माझ्या लेव्हलला मी डिसीजन घेतला आहे की कुठल्याही शाळेमध्ये गडबड झाली तर मी तेथील मुख्याध्यापकाला सस्पेंड न करता केंद्रप्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाई करेन असा इशारा त्यांनी दिला. पहिली कारवाई पर्यवेक्षीय यंत्रणेवर कारण ते शाळेवर जातच नसल्याने खाली सर्व अंदाधुंदी आहे. इ-लर्निंग सुरू करण्याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी खूप चांगला प्रतिसाद दिल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगून पहिल्या वर्षी जिल्ह्यातील अडीचशे शाळांमध्ये ई-लर्निग सुरू करण्याचा विचार आहे अॅक्टीव्हीटी बेस्ड लर्निंग एक छान संकल्पना आहे. ही काही ठिकाणी लवकरच सुरू करण्यात येणार आहे.तारखेचा पाढा ही संकल्पना आणण्यात येणार आहे. जी तारीख असेल त्या तारखेचा पाढा त्या दिवशी पाठ करायचा अशी संकल्पना आहे. गणितासाठी चांगले गणित शिकविणाऱ्या बाहेरच्या शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे. इयत्ता पाचवी, सहावी, सातवीचे गणित सोप करून शिकविण्याचा उपक्रम चळवळीच्या माध्यमातून घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यातील २५० शाळामध्ये ई-लर्निंग
By admin | Updated: February 22, 2015 22:35 IST