Join us  

महापालिका शाळेतील १२ टक्के विद्यार्थ्यांना ई-सिगारेटचे व्यसन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 3:12 AM

एकीकडे व्यसनमुक्तीसाठी विविध पातळ््यांवर काम सुरु असताना दुसरीकडे मात्र मुंबई शहर-उपनगरात असणाऱ्या महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना ई- सिगारेटचे व्यसन असल्याचे उघड झाले आहे.

मुंबई : एकीकडे व्यसनमुक्तीसाठी विविध पातळ््यांवर काम सुरु असताना दुसरीकडे मात्र मुंबई शहर-उपनगरात असणाऱ्या महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना ई- सिगारेटचे व्यसन असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे धूम्रपानाचा आधुनिक प्रकार असलेल्या या ई-सिगारेटस् टपºयाआणि आॅनलाईन पद्धतीने सहजरित्या उपलब्ध होत आहेत. शाळकरी मुले व्यसन म्हणून नव्हे तर ‘फॅशन’ म्हणून या ई-सिगारेटचे झुरके घेत आहेत. सलाम बॉम्बे संस्थेने केलेल्या अभ्यास अहवालात धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. त्यामुळे शालेय वयात मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. संस्थेने २०१८ साली केलेल्या अभ्यास अहवालानुसार, शहर-उपनगरातील ४० पालिका शाळांमधील हा अहवाल आहे.या शाळांमधील सातवी, आठवी व नववीच्या सुमारे ४ हजार ३०२ विद्यार्थ्यांशी सलाम बॉम्बे संस्थेच्या चमूने संवाद साधला. यावेळी, विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यातून हे धक्कादायक वास्तव उघडकीस आले. एकूण विद्यार्थ्यांपैकी ३४ टक्के विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची तयारी दर्शविली. या ३४ टक्क्यांमध्ये १४ टक्के विद्यार्थीनींचा तर २० टक्के विद्यार्थ्यांचा समावेश आहे.ई- सिगारेट ओढण्याचे कारण या विद्यार्थ्यांना विचारले असता, सामाजिक स्तरावर ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून हे व्यसन करत असल्याचे ४३.७ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. या व्यसनातून २८.८ टक्के विद्यार्थ्यांना आनंद मिळतो. अहवालात ९.३ टक्के विद्यार्थी कुतूहलापोटी, तर ७ टक्के विद्यार्थी ताण दूर करण्यासाठी आणि ६ टक्के विद्यार्थी कंटाळा येतो म्हणत या व्यसनाच्या अधीन झाल्याचे चिंताजनक वास्तव उघडकीस आले आहे.पॉकेटमनी से लेती हूँ ...माझ्या घरातून पॉकेटमनीसाठी खूप पैसे मिळतात. त्यातून ५०० रुपयांत कुठल्यातरी जवळच्या दुकानातून ही सिगारेट विकत घेत असल्याचे एका आठवीतल्या विद्यार्थीनीने सांगितले. शिवाय, ही सिगारेट कोणत्या तरी मुलाला विकत घेण्यास सांगत असून त्यानंतर एकत्रपणे याचा आनंद घेत असल्याचे तिने सांगितले.ई सिगारेट म्हणजे काय?ई सिगारेटचा धूर होत नाही़ ही इलेक्ट्रॉनिक सिगारेट असते. यात निकोटीन हे तंबाखूत असलेले द्रव्य समाविष्ट असते. या सिगारेटचे उपकरण बॅटरीवर सुरु होते.सिगारेट ओढताना त्यातील द्रवरुपी निकोटिनची वाफ तयार होऊन ती ओढली जाते. या वाफेला प्रत्यक्ष धूम्रपान केल्यासारखा वास नसतो. सिगारेट प्रत्यक्ष पेटवली जात नसल्यामुळे त्यापासून राखही तयार होत नाही.

टॅग्स :मुंबई