मुंबई : विलेपार्ले पूर्व येथील प्रबोधनकार ठाकरे जलतरण तलावात सुरू करण्यात आलेल्या ‘क्रॅश कोर्स’मध्ये सहभागी झालेल्या श्रेया भोसले या ३७ वर्षीय महिलेचा मंगळवारी रात्री बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी या कोर्सच्या प्रशिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रक्षा महादेवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री श्रेया जलतरण तलावात पोहण्यासाठी गेल्या होत्या. तथापि, पोहता येत नसल्याने त्या बुडाल्या. नाकातोंडात पाणी जाऊन त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालातूनही हे समोर आले आहे.
तरण तलावात बुडून महिलेचा मृत्यू
By admin | Updated: May 21, 2015 02:32 IST