Join us

मानखुर्दमध्ये विहिरीत बुडून चिमुकल्याचा मृत्यू

By admin | Updated: March 26, 2017 03:16 IST

घराबाहेर खेळत असताना विहिरीत पडून एका चार वर्षांच्या बालकाचा मृत्यू होण्याची घटना मानखुर्द येथील शिवनेरीनगर

मुंबई : घराबाहेर खेळत असताना विहिरीत पडून एका चार वर्षांच्या बालकाचा मृत्यू होण्याची घटना मानखुर्द येथील शिवनेरीनगर परिसरात घडली आहे. पीयूष शेलार असे या चिमुरड्याचे नाव आहे. शेलार कुटुंबीय राहात असलेल्या परिसरात जुनी विहीर आहे. त्यावर झाकण नाही. पीयूष या घरासमोर खेळत असताना, अचानक त्याचा तोल गेला आणि तो विहिरीत पडला. स्थानिकांनी तत्काळ त्याला बाहेर काढत एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, डोक्याला गंभीर  दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू  झाला. (प्रतिनिधी)