Join us
Daily Top 2Weekly Top 5

शहरात धुळीचे साम्राज्य

By admin | Updated: May 19, 2014 05:20 IST

सायंकाळी तुर्भेसह अनेक ठिकाणी वादळ आल्यामुळे शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते.

नवी मुंबई : सायंकाळी तुर्भेसह अनेक ठिकाणी वादळ आल्यामुळे शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते. पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे रस्त्यावरील वर्दळही कमी झाली होती. शहरातील तापमान ३४ अंशावर गेले असल्यामुळे नागरिकांना तीव्र उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. सकाळी ११ ते सायंकाळी तीनपर्यंत शहरात फिरताना उन्हाचा त्रास होत आहे. आज दुपारपासून ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. तुर्भे, एमआयडीसीतील दगडखाण परिसरात वादळामुळे वातावरणात धुळीकणाचे प्रमाण वाढले होते. सूर्यास्तापूर्वीच अंधार दिसू लागला होता. धुळीमुळे आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. पाऊस पडण्याची शक्यताही निर्माण झाली होती. ढगाळ वातावरण व धुळीमुळे वाहतुकीवरही परिणाम झाला होता. (प्रतिनिधी)