Join us
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यांत साडेतीन हजार लीटर दुधाचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 06:24 IST

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने सहा महिन्यांत ३ हजार ५७६ लीटर दुधाचा साठा जप्त करून ११ जणांवर गुन्हे दाखल केले.

मुंबई : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने सहा महिन्यांत ३ हजार ५७६ लीटर दुधाचा साठा जप्त करून ११ जणांवर गुन्हे दाखल केले.जानेवारी ते सप्टेंबरमध्ये विशेष पथकाने अंधेरी, मालाड, गोरेगाव, खार येथे धाड टाकली. येथून दुधाचे तब्बल १,४३३ नमुने गोळा करून वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीस पाठविले. जानेवारीत २,७१६ लीटर दूध, एप्रिल ते जुलैमध्ये १०० लीटर, सप्टेंबरमध्ये ७६० लीटर दुधाचा साठा जप्त केल्याचे विभागाचे सहआयुक्त (अन्न) शैलेश आढाव यांनी सांगितले.

टॅग्स :दूध