Join us  

दिवसभरात ७८२७ रुग्ण, तर १७३ मृत्यू, एकूण रुग्णसंख्या अडीच लाखांहून अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 7:23 PM

राज्यात १ लाख ३ हजार ५१६ रुग्णांवर उपचार सुरु

मुंबई – राज्याच्या रुग्णसंख्येने रविवारी अडीच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या राज्यात एकूण रुग्णसंख्या २ लाख ५४ हजार ४२७ इतकी असून १ लाख ३ हजार ५१६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिवसभरात ७ हजार ८२७ रुग्णांची नोंद झाली असून १७३ मृत्यू झाले आहेत. राज्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा १० हजार २८० वर पोहोचला आहे.

राज्यात बरे झालेल्या रुग्णांचा दर ५५.१५ टक्के असून मृत्यूदर ४.४ टक्के आहे. राज्यात दिवसभरात ३ हजार ३४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत राज्यात एकूण १ लाख ४० हजार ३२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात नोंद झालेल्या १७३ मृत्यूंमध्ये मुंबई ४४ , ठाणे ६, ठाणे मनपा २२, नवी मुंबई मनपा १०, कल्याण डोंबिवली मनपा ५, उल्हासनगर मनपा १, भिवंडी निजामपूर मनपा २, मीरा भाईंदर मनपा २, पालघर १, वसई विरार मनपा ७, रायगड १, पनवेल मनपा १, नाशिक १, नाशिक मनपा ७, धुळे २, जळगाव २, पुणे ५, पुणे मनपा २२, पिंपरी चिंचवड मनपा १०, सोलापूर मनपा ३, कोल्हापूर १, रत्नागिरी १, औरंगाबाद १, औरंगाबाद मनपा ५, जालना ३, लातूर १, बीड १, नांदेड ३, अकोला मनपा १, गोंदिया १, अन्य राज्य/ देश १ या रुग्णांचा समावेश आहे.

मुंबईत रविवारी १ हजार २४३ रुग्ण , तर ४४ मृत्यूंची नोंद झाली. मुंबईत कोरोन बाधितांची एकूण संख्या ९२ हजार ९८८ असून बळींचा आकडा ५ हजार २८८ झाला आहे. सध्या मुंबईत २२ हजार ५४० रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १३ लाख १७ हजार ८९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९.३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ८६ हजार १५० व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४७ हजार ८०१ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

रुग्णालयात दाखल असलेल्या ९० टक्के रुग्ण लक्षणेविरहित

राज्यातील रुग्णसंख्या अडीच लाखांहून अधिक आहे, यात जवळपास १ लाखांहून अधिक रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण लक्षणे विरहित असल्याचे वैद्यकीय शिक्षण संचालनलयाच्या अहवालात नमूद आहे. अवघ्या ६ टक्के रुग्णांना लक्षणे आहेत. तर ४ टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याराजेश टोपेमुंबई