मुंबई : नवरात्रीच्या नवरंगांची उधळण सर्वत्र होत आहे. यातच आदिमायेच्या आशीर्वादाने ‘लोकमत’ वृत्तसमूह समाजातील दुर्गाना पुरस्काराने सन्मानित करत आहे. नवरात्रीच्या तिस:या माळेला म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी काळाचौकी येथील ‘एम.आर. सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, अभ्युदयनगर’ येथे कार्यक्रम पार पडला. येथील स्थानिक रहिवासी पॉवरलिफ्टिंग आणि वेटलिफ्टिंग खेळाडू कल्पना मधुकर सावंत यांना ‘स्पिरिट ऑफ दुर्गा’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
कल्पना सावंत यांना राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत 4 सुवर्णपदके, कांस्यपदक आणि रौप्यपदक मिळाले असून, या खेळासाठी महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार, मराठी गौरव, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, राष्ट्रीय गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर खुल्या स्पर्धा, महापौर स्पर्धा आणि स्ट्राँग वुमन ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराच्याही त्या मानकरी ठरल्या आहेत. वेटलिफ्टिंग या खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धेतही त्यांनी अनेक कांस्यपदके मिळवून प्रावीण्य मिळविले आहे. त्यांच्या या वैशिष्टय़पूर्ण कामगिरीबद्दल ‘लोकमत’ने त्यांना ‘स्पिरिट ऑफ दुर्गा’चा किताब देऊन सन्मानित केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एमआर सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचे अध्यक्ष अशोक नायक यांचे सहकार्य लाभले.
नवरात्रीच्या चौथ्या माळेला दोन ठिकाणी ‘लोकमत’ने कार्यक्रम आयोजित करून महिलांना सन्मानित केले. 28 सप्टेंबर रोजी चेंबूर येथील जय माताजी मित्रमंडळ येथे उद्योजिका उषा कुलकर्णी यांना ‘स्पिरिट ऑफ दुर्गा’ने सन्मानित करण्यात आले.
उद्योजिका असलेल्या कुलकर्णी यांनी आयुष्यात स्वत:च्या पायावर उभं राहण्याचं ध्येय मनात बाळगून अपार मेहनत, चिकाटी आणि कमालीची जिद्द या जोरावर स्वबळावर प्रतिभा इंडस्ट्रिज उभी केली. गेली 35 वर्षे या इंडस्ट्रिजच्या संचालिका म्हणून कार्यरत असलेल्या उषा कुलकर्णी यांना आतार्पयत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
उद्योजिकेची उत्कृष्ट भूमिका पार पाडताना समाजाचं आपण देणं लागतो या सामाजिक जाणिवेने आणि महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्यांनी लघुउद्योगही सुरू केले. चेंबूर महिला महोत्सवाच्या कार्याध्यक्षा म्हणूनही त्या कार्यरत आहेत.
आपल्या औद्योगिक आणि सामाजिक कारकिर्दीच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने स्पिरिट ऑफ दुर्गाचा किताब देऊन त्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चेंबूर महिला महोत्सव समितीच्या अध्यक्षा राजश्री पालांडे यांचे विशेष सहकार्य मिळाले.
दादर येथील सवरेदय नवरात्रौत्सव मंडळात विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करून ‘लोकमत’ने येथील नागरिकांना मनमुराद आनंद लुटण्याची संधी दिली. महिलांनी मराठमोळी फुगडी घालून आनंद साजरा केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे नुकुल वीरा यांचे सहकार्य मिळाले. सर्वच ठिकाणच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी दिलखुलासपणो केले. (Aप्रतिनिधी)
1) दादर येथील सवरेदय नवरात्रौत्सव मंडळ येथे सहभागी झालेले स्पर्धक. 2) जय माताजी मित्रमंडळ, चेंबूर येथील उद्योजिका उषा कुलकर्णी यांना ‘स्पिरिट ऑफ दुर्गा’ने सन्मानित करण्यात आले. 3) सवरेदय नवरात्रौत्सव मंडळ, दादर येथील खेळांच्या विजेत्या, एम.आर. 4) सवरेदय नवरात्रौत्सव मंडळातील महिलांनी मराठमोळी फुगडी घालून आनंद साजरा केला. 5) अभुदयनगर, काळाचौकी येथील उत्साही स्पर्धक.