रेवदंडा : चौल - रेवदंडा परिसरात सकाळपासूनच अनेक नवरात्रोत्सव मंडळांनी वाजत-गाजत दुर्गामूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी सगळ्यांचीच लगबग जाणवत होती. अनेक मंडळांचे कार्यकर्ते दुर्गामातेच्या स्वागतासाठी कोणतीही उणीव राहू नये, यासाठी डोळ्यात तेल घालून सज्ज होते. मंडपातील आकर्षक विद्युत रोषणाई, नयनरम्य आरास, फुलांची सजावट, रांगोळ्यांची नक्षी, अन्य बारीक- सारीक राहिलेली कामे पूर्ण करण्याची धडपड कार्यकर्त्यांत दिसत होती. अनेक कुटुंबांत घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी कुलदेवतेच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून नवरात्र उत्सवाला सुरूवात करण्यात आली. चाकरमानी मंडळी गावात दाखल झाली आहेत. फुले व फळबाजार नवरात्रीने चांगलाच वधारला आहे तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीने वातावरण तापत आहे. (वार्ताहर)
दुर्गामातेची भक्तिभावाने प्रतिष्ठापना
By admin | Updated: September 25, 2014 23:41 IST