Join us

पावणे तीन लाखांचा चरस बाळगणाऱ्यास ठाण्यात अटक

By admin | Updated: April 21, 2015 22:55 IST

रेल्वे स्थानकाजवळील एका पानटपरीवर चरस विक्रीच्या तयारीत असलेल्या अशोक जयस्वार याला गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली

ठाणे : रेल्वे स्थानकाजवळील एका पानटपरीवर चरस विक्रीच्या तयारीत असलेल्या अशोक जयस्वार याला गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून पावणेतीन लाखांचा चरस जप्त केला आहे. ठाणे रेल्वे स्थानकाजवळील फलाट क्रमांक-१ समोर १९ एप्रिल रोजी दुपारी २ वा.च्या सुमारास तो चरस विक्रीच्या तयारीत असतानाच पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी, उत्तम भोसले, काळुराम शिरोसे, दिलीप सोनवणे या पथकाने त्याला अटक केली. महिनाभरापूर्वीच त्याने हा माल आणला होता. त्याच्या टपरीवरूनच हा माल विकण्यासाठी तो गिऱ्हाईक शोधत होता.