सुनील घरत, पारोळबांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे आजमितीस वसई पुर्व भागात करोडो रूपयांच्या विटा गिऱ्हाईकाअभावी पडून आहेत, त्यामुळे वीट उत्पादक काळजीत सापडले आहेत.शेती कसायला परवडत नसल्यामुळे या भागातील भुमिपुत्र मोठ्या प्रमाणात वीट उत्पादन क्षेत्रात उतरल्यामुळे या व्यवसायाची उलाढाल करोडोच्या घरात गेली व या धंद्याने अनेकांना वैभवही प्राप्त करून दिले, पण काही वर्षे तेजीत असलेला हा धंदा बांधकाम क्षेत्रातील मंदी व रेतीवरील बंदीमुळे ओहोटीला लागला आहे. वीटउत्पादन करण्यासाठी तुस, कोळसा, राख, माती, मजुर महाग झाल्यामुळे एक हजार वीट उत्पादन करण्यासाठी उत्पादकाला ३२०० ते ३५०० खर्च येत असून या वर्षी विटेला भाव हजारी २५०० ते ३००० दरम्यान असल्यामुळे विट उत्पादकाला ५०० रू. ची खोट खाऊन वीट विकण्यासारखी बिकट परिस्थिती होती.खोट खाऊन विकण्यापेक्षा भाव वाढेल तेव्हा विकू असे उत्पादकाला वाटल्यामुळे व भाव न वाढल्यामुळे करोडो रू. ची तयार वीट पडून आहे. केंद्र सरकार बदलले आहे. आता आमचे चांगले दिवस केव्हा येतील याची वाट उत्पादक पाहत आहेत.
बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे वीट व्यवसायाला घरघर
By admin | Updated: June 8, 2014 23:43 IST