Join us

उल्हासनगरात नाल्याचा स्लॅब पडल्यानेच रुळाच्या मधोमध खड्डा

By admin | Updated: June 28, 2015 02:24 IST

शहरातील स्टेशननजीकच्या नाल्यावरील पुलाचा स्लॅब कोसळल्यानेच शनिवारी पुन्हा रेल्वे रूळाच्या मधोमध खड्डा पडल्याचा सशंय व्यक्त होत असून रेती, माती, दगडाने

सदानंद नाईक , उल्हासनगर शहरातील स्टेशननजीकच्या नाल्यावरील पुलाचा स्लॅब कोसळल्यानेच शनिवारी पुन्हा रेल्वे रूळाच्या मधोमध खड्डा पडल्याचा सशंय व्यक्त होत असून रेती, माती, दगडाने तो भरल्याने नाल्याचा पाणी प्रवाह बंद झाला आहे. प्रवाह बंद झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे शनिवारीही मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.उल्हासनगरात रेल्वे रुळाखालील नाला पुलाचा अंतर्गत स्लॅब कोसळल्याने १२ फुटी खड्डा रूळामधोमध पडल्याने शुक्रवारी सकाळी तीन तास लोकल सेवा बंद पडली होती. ती सुरू होण्यासाठी रेल्वे कामगारांनी खड्ड्याची कोणतीही खातरजमा न करता रेती, माती, दगडाच्या गोण्यांनी तो बुजवला. मात्र, यामुळे नाल्याचा प्रवाह बंद पडून रेल्वे रूळागत १० फूट पाणी साचले आहे. या प्रकाराने रेल्वे यंत्रणेची झोप उडाली आहे. कारण पावसाने विश्रांती घेतली नसती तर रेल्वे रूळ पाण्याच्या प्रवाने वाहून जाण्याची शक्यता होती. यामुळे खबदारी म्हणून पंप लावून साचलेले पाणी वालधुनी नदीत सोडण्यात येत आहे. शनिवारी पुन्हा खड्डा पडल्याचे लक्षात आल्यावर रेल्वे अधिकाऱ्यांसह शेकडो कर्मचारी कामाला लागले आहेत. त्यांच्या सोबत उल्हासनगर महापालिका कर्मचारीही काम करीत असल्याची माहिती पालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी दिली. मुंबई मध्य रेल्वेचे मंडळ रेल्वे प्रबंधक अमिताभ ओझा यांनीही घटनास्थळी भेट देऊन या पुलाचा अंतर्गत काही भाग कोसळल्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच नाल्याचा बंद पडलेला प्रवाह पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू असून तज्ज्ञाच्या सर्वेक्षणानंतर त्याच्या पुनर्बांधणीची शक्यता त्यांनी व्यक्त केली. रोज ‘मरे’.. मध्य रेल्वेच्या मशीद बंदर स्थानकावर रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे पुन्हा एकदा रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. सकाळी सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली. दादर स्थानकातून गाडी पुढे जात नसल्यामुळे डब्यातील काही प्रवाशांनी गाड्यांमधून उड्या मारून चालत जाणे पसंत केले.