वडखळ : मुंबई-गोवा महामार्ग हा राष्ट्रीय नव्हे तर खड्डेमार्ग बनला आहे. त्यामुळे या महामार्गामुळे प्रवास करताना वाहनचालक प्रचंड हैराण झाले आहेत. पावसाळा गेला, निवडणुका झाल्या तरी मुंबई- गोवा महामार्गाच्या दुरुस्तीला मुहूर्त सापडलेला नाही. महामार्गावर पेण-वडखळ पुढे कोलेटी पर्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमध्ये गाड्या आपटून वाहने नादुरूस्त होऊन वाहतूक कोंडी निर्माण होते. खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा ताण पोलीस यंत्रणेवर पडतो. वडखळ, खाचरखिंड, अंतोरा फाटा, गडब, कोलेटी या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून अनेक अपघात घडले आहेत. या अपघातांत अनेकांना प्राण गमवावे लागल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण
By admin | Updated: November 10, 2014 00:17 IST