Join us
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांमुळे भक्त हैराण

By admin | Updated: September 9, 2014 23:43 IST

मुरुड तालुक्यात सर्वच रस्ते खड्डेमय असून खड्डे बुजविण्यासाठी मजूरवर्ग सार्वजनिक बां. अभियंत्यांना भेटत नसल्याने ही अवस्था झाली असल्याचे दिसून येते.

आगरदांडा : मुरुड तालुक्यात सर्वच रस्ते खड्डेमय असून खड्डे बुजविण्यासाठी मजूरवर्ग सार्वजनिक बां. अभियंत्यांना भेटत नसल्याने ही अवस्था झाली असल्याचे दिसून येते. प्रचंड खड्डे व सातत्याने होणारी वाहतूक यामुळे गणेशभक्त हैराण झाले आहेत. यंदा बाप्पाचा प्रवास खड्ड्यातूनच सुरू झाला आणि त्याला निरोपही खड्ड्यातून द्यावा लागण्याची वेळ भक्तांवर आली. सार्वजनिक बांधकाम खात्याचे दोन अभियंते याठिकाणी कार्यरत आहेत मात्र त्यांना परिसरातील खड्डे बुजवता आलेले नाहीत. तालुक्यात प्रत्येक ठिकाणी रेती व खडी बघावयास मिळते. परंतु खड्डे बुजवण्यास अद्याप सुरुवात झालेली नाही.