Join us

एकहाती सत्ता तरीही राष्ट्रवादीला भीती फंदफितुरीची

By admin | Updated: August 19, 2014 00:21 IST

नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीची म्हणण्यापेक्षा ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री गणोश नाईक यांची एकहाती सत्ता आह़े

नारायण जाधव - ठाणो
नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीची म्हणण्यापेक्षा ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री गणोश नाईक यांची एकहाती सत्ता आह़े तसेच लोकसभा असो की विधानसभा, दोन्ही निवडणुकांत केवळ नवी मुंबईतच नव्हे तर राज्यभरात महत्त्वाची भूमिका बजावणारे माथाडी कामगार आणि व्यापा:यांचे रोजीरोटीचे स्थान असलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती या दोन्ही संस्थांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वर्चस्व आह़े यात बाजार समितीचे व्यापारी आणि माथाडी या दोन्ही घटकांतील माथाडी कामगारांच्या सर्वात जास्त वसाहती ऐरोली मतदारसंघात आहेत़ तरीही फंदफितुरीची भीती राष्ट्रवादीला आह़े
पालकमंत्री गणोश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक हे ऐरोलीचे प्रतिनिधित्व करतात़ गेल्या पाच वर्षात त्यांनी महावितरणशी संबंधित विविध नागरी समस्या, माथाडींसह प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेली घरे आणि सिडकोने बांधलेल्या धोकादायक इमारतींना जादा चटईक्षेत्र देण्याची  सातत्याने लावून धरली आह़े सीआरङोडसाठी पाठपुरावा केला आह़े राज्यात सत्ता असूनही या मागण्यांसाठी सिडकोवर मोर्चाही काढला आह़े
बाजार समितीचे चेअरमन असो वा  माथाडी कामगारांचा प्रतिनिधी, भाजीपाला, फळे आणि कांदा, बटाटा व्यापा:यांचा प्रतिनिधी हे सारे राष्ट्रवादीशी जवळीक साधून आहेत़ तसेच त्यांचे गेल्या खेपेचे पराभूत उमेदवारही राष्ट्रवादीचेच आहेत़ धान्य आणि मसाला मार्केटचे प्रतिनिधित्व करणारे व्यापारी राष्ट्रवादीचे सदस्य नसले तरी राष्ट्रवादीप्रेमी आहेत़ तसेच नवी मुंबई महापालिकेतून बाजार समितीवर गेलेले नगरसेवक चंद्रकांत पाटील हे केवळ तुभ्र्यातील नगरसेवकच नसून माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस आहेत़ 
आज ऐरोली विधानसभा मतदारसंघात नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादीचे 27 नगरसेवक आहेत़ त्याखालोखाल शिवसेनेचे 9, काँग्रेसचे 3 आणि अपक्ष 4 नगरसेवक आहेत़ शिवाय राष्ट्रवादीच्या सुरेश कुलकर्णी आणि संगीता वास्के या दोन नगरसेवकांचे वार्ड ऐरोली-बेलापूर अशा दोन्ही मतदारसंघांत विभागले गेले आहेत़ यात कुलकर्णी हे स्थायी समितीचे सभापती आहेत़ महापालिकेत एकहाती सत्ता असल्याने दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणो, वाशी, तुर्भे या सर्व प्रभाग समित्यांसह विषय समित्यांवर राष्ट्रवादीचे सभापती आहेत़ शिक्षण मंडळ आणि एनएमएमटीही त्यांच्याच ताब्यात आहेत़ इतके एकहाती वर्चस्व असतानाही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ऐरोलीतून राष्ट्रवादीच्या संजीव नाईकांना 2क् हजारांहून अधिक मतांची पिछाडी मिळाली़ यात अॅण्टीइन्कबन्सीसह मोदीलाटेच्या तडाख्याचाही समावेश आह़े आता संदीप नाईकांसह लोकसभेतील पराभूत उमेदवार संजीव नाईकांची नावे चर्चेत आहेत़ परंतु, उमेदवारीची माळ संदीप नाईक यांच्याच गळ्यात पडेल, असे दिसत़े त्यादृष्टीने ते कामाला लागले आहेत़ विविध विभागांत त्यांनी समस्या मेळावा, रोजगार मेळावा, स्वच्छता अभियानासह दाखले वाटप शिबिर कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली असून पक्षातील नाराज नगरसेवकच त्यासाठी मेहनत घेण्यास सुरुवात केली आह़े मात्र, मोदीलाटेचा प्रभाव आणि पक्षांतील काही कथित ज्येष्ठांच्या नाराजीची काँग्रेसजनांची बंडखोरी अन् भाऊबंदकीच्या वादाची त्यांना भीती आह़े 
़तिकडे शिवसेना गटातटांत विभागली गेली आह़े पक्षाच्या कार्यक्रमात खासदार संजय राऊतांसमक्ष पक्षाचे युवा अध्यक्ष खाली तर थिल्लर कार्यकर्ते व्यासपीठावर असे चित्र शिवसैनिकांना अनेकदा पाहायला मिळाले आह़े काही ज्येष्ठ नेत्यांनी तर नवी मुंबईत शिवशाहीऐवजी ‘शिवीशाही’ रुजवली आह़े पक्षाचे जे 9 नगरसेवक त्यात सर्वाधिक नगरसेवक ऐरोली उपनगरातील आहेत़ रबाले, घणसोली, कोपरखैरण्यात सेनेची ताकद नगण्य आह़े 
 
पालकमंत्री गणोश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक हे ऐरोलीचे प्रतिनिधित्व करतात़ पाच वर्षात त्यांनी महावितरणशी संबंधित विविध नागरी समस्या सातत्याने लावून धरल्या आहेत़ सीआरङोडसाठी पाठपुरावा केला आह़े 
 
सेनेकडून सध्या तरी विजय चौगुले आणि वैभव नाईक ही दोनच नावे चर्चेत आहेत़ चौगुलेंचे ऐरोलीत वर्चस्व आह़े जे 9 नगरसेवक आहेत, त्यात त्यांच्या समर्थकांचा भरणा जास्त आह़े मात्र, गुन्हेगारी पाश्र्वभूमी ही त्यांच्या मार्गातील प्रमुख अडसर आहे.गेल्या खेपेला याच मुद्यावर राष्ट्रवादीने निवडणूक जिंकली होती़ तर वैभव यांच्याकडे कोपरखैरणो, घणसोलीत युवकांची मोठी फौज आह़े मात्र, ते राजकारणात नवखे आहेत़ परंतु चुलत भाऊ संजीव यांना पराभूत करण्याची किमया घडविण्यात मोलाचा हातभार लावला.