Join us

राष्ट्रगीतासाठी उभे न राहिल्याने कुटुंबाला थिएटरबाहेर हाकलले

By admin | Updated: November 30, 2015 17:12 IST

चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी उभं न राहिल्याने प्रेक्षकांनी एका कुटुंबाला थिएटरबाहेर काढल्याची घटना कुर्ल्यातील पीव्हीआर थिएटरमध्ये घडली.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३० - चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी उभं न राहिल्याने प्रेक्षकांनी एका कुटुंबाला थिएटरबाहेर काढल्याची घटना कुर्ल्यातील पीव्हीआर थिएटरमध्ये घडली. राष्ट्रगीतासाठी उभे का राहिला नाहीत असा सवाल संतप्त प्रेक्षकांनी त्या लोकांना विचारत त्यांना सरळ थिएटरबाहेर हाकललं. 'तमाशा' चित्रपटादरम्यानच थिएटरमध्येच हा तमाशा घडला.
कुर्ल्यातील फिनिक्स मार्केट सिटीमधील पीव्हीआरमध्ये ही घटना घडली. 'तमाशा' चित्रपट सुरू होण्यापूर्वी नेहमीप्रमाणे राष्ट्रगीत सुरू झाले, मात्र त्यावेळी एक कुटुंब राष्ट्रगीतासाठी उभं राहिलं नाही.त्यामुळे थिएटरमध्ये उपस्थित इतर प्रेक्षकांनी राष्ट्रगीत संपल्यावर त्या कुटुंबियांना याचा जाब विचारला असता त्यांच्यात बाचाबाची झाली. अखेर संतापलेल्य प्रेक्षकांनी त्या कुटुंबियांना बाहेरचा रस्ता दाखवला. दरम्यान तेथे उपस्थित एका प्रेक्षकाने या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर टाकल्याने, हा प्रकार उघडकीस आला.