Join us

मेट्रोमुळे थर्टीफर्स्टला वर्सोवा, जुहू चौपाट्यांवर होणार गर्दी

By admin | Updated: December 30, 2014 00:52 IST

गेल्या ८ मे रोजी वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावर मुंबईतील पहिली मेट्रो रेल्वे सुरू झाली. मेट्रोमुळे पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारे अंतर फक्त २१ मिनिटांवर आले.

मनोहर कुंभेजकर ल्ल अंधेरीगेल्या ८ मे रोजी वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावर मुंबईतील पहिली मेट्रो रेल्वे सुरू झाली. मेट्रोमुळे पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारे अंतर फक्त २१ मिनिटांवर आले. वर्सोव्याकडे घाटकोपरवरून येणारी शेवटची मेट्रो रेल्वे रात्री १२च्या सुमारास आहे; तर वर्सोव्यावरून घाटकोपरकडे जाणारी पहिली मेट्रो रेल्वे सकाळी ५.३०ला आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास करून सात बंगला, जुहू, वर्सोवा येथील चौपाट्यांवर थर्टीफर्स्टला जास्त गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, चेंबूर येथून पर्यटक मोठ्या संख्येने मेट्रोने प्रवास करून शनिवार आणि रविवारी वर्सोवा येथील सात बंगला चौपाटी, जुहू सिल्व्हर बीच, चौपाट्यांवर गर्दी करीत असल्याचे सध्या चित्र आहे.मेट्रो सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच येणारा ३१ डिसेंबर असल्यामुळे मेट्रोला प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरवर्षी ३१ डिसेंबरला जुहू, सात बंगला चौपाट्यांवर थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. आता तर मेट्रो सुरू झाल्यामुळे या चौपाट्यांवर जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांची चांगलीच कसोटी लागणार आहे.मेट्रोने वर्सोव्याला उतरल्यावर सरळ ५ मिनिटे चालत गेल्यावर सात बंगला चौपाटी येते. अलीकडेच येथील सुमारे २०० अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त केल्यामुळे सात बंगला चौपाटी चकाचक झाली आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. च्वर्सोवा मेट्रो स्थानकावरून जुहू सिल्व्हर बीच रिक्षाने १० मिनिटांच्या अंतरावर, जुहू चौपाटी २० मिनिटांच्या अंतरावर, १५ मिनिटांवर जुहूचे हरेकृष्ण हरेराम मंदिर, १० मिनिटांवर वर्सोवा कोळीवाडा आहे. वर्सोवा जेट्टीवरून पलीकडे फेरी बोटीने प्रवास करता येतो. च्त्यानंतर पुढे मढ जेट्टीवरून रिक्षा किंवा बसने मढ कोळीवाडा येथील मढ चौपाटी, मढचा किल्ला, समुद्रकिनारी असलेले पुरातन किल्लेश्वर महादेव मंदिर, प्रसिद्ध जागृत हरबादेवी मंदिर आदी अनेक ठिकाणे मेट्रोमुळे खूपच जवळ आली आहेत. च्त्यामुळे येत्या थर्टी फर्स्टला या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांसमोरदेखील हे एक मोठे आव्हान ठरणार आहे. च्मुंबई : व्यसनमुक्तीचा संदेश देत ‘नवे वर्ष धुंदीत नव्हे, तर शुद्धीत साजरे करा’ असे आवाहन राज्याच्या नशाबंदी मंडळाने केले आहे. शिवाय जनजागृतीसाठी उद्या (मंगळवारी) विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.च्सीएसटी रेल्वे स्थानकाबाहेरील बेस्टच्या १३८ क्रमांक बसथांब्यासमोर दुपारी ३.३० वाजता हा विशेष कार्यक्रम पार पडणार आहे. त्यात विशेष आकर्षण म्हणून सहा फुटी बलूनरूपी प्राणी लोकांना नशेपासून दूर राहण्याचे आवाहन करतील. नशामुक्तीबाबत जनजागृती करणारी पत्रके वाटून या वेळी प्रबोधनात्मक गाण्यांचा कार्यक्रमही पार पडणार आहे.च्राज्य शासनाचे व्यसनमुक्तीचे ब्रँडअ‍ॅम्बेसेडर सिद्धार्थ जाधव, दिलीप प्रभावळकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या तयार करण्यात आलेल्या व्यसनमुक्तीच्या ग्राफिटीच्या माध्यमातून लोकांना या अभियानात सामील होण्याचे आवाहन केले जाईल. तरी अधिकाधिक लोकांनी उद्या होणाऱ्या कार्यक्रमात सामील होण्याचे आवाहन मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी केले आहे.