Join us  

नेटवर्क नसल्याने रेल्वे प्रवासी, कर्मचाऱ्यांची वायफायकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 8:47 AM

सेवा मोफत, पण नॅाटरिचेबल; अत्यंत धिम्यागतीने होते कनेक्ट

- नितीन जगतापमुंबई: सध्याच्या काळात वायफायचा वापर चांगलाच वाढला. मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकात वायफाय सेवा सुरू करण्यात आलाय आहे.असे असले तरी वायफायचे नेट स्लो असल्याने प्रवासी आणि कर्मचारी त्याकडे पाठ फिरवत आहेत.रेल्वेने वायफाय सुविधा मुंबई रेल्वे स्थानकावर २०१६ मध्ये मोफत सुरू केली होती. रेल टेल या सार्वजनिक मालकीच्या कंपनीकडून ही सेवा रेल्वेवर आर्थिक भार पडू न देता दिली जात आहे. यात गुगल व दूरसंचार मंत्रालय, पीजीसीआयएल, टाटा ट्रस्ट यांचे सहकार्य आहे.सीएसटी स्थानकात लोकलमध्ये मुंबई आणि महानगर परिसरातील तसेच एक्सप्रेस गाड्यांसाठी राज्यांर्गत आणि परराज्यातील काही प्रवासी येतात.रेल्वे स्थानकावर वायफाय सुविधेचे फलक आहेत? मुंबईत रेल्वे स्थानकात वायफाय सुविधा सुरू करण्यात आली आहे याची माहीती प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना आहे. रेलवायफायचे नेट स्लो असल्याने कर्मचारी आणि प्रवासी त्याचा वापर कमी प्रमाणात करत आहेत.काय आहे वायफाय सुविधामुंबईतील अनेक रेल्वे स्थानकात वायफाय सुविधा सुरू आहे मात्र, हा वायफाय वापरण्यासाठीही मर्यादा आहेत. तुम्ही रेल्वे स्थानकात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला वायफाय वापरण्यासाठी रिक्वेस्ट करावी लागते. त्यानंतर मोबाईलवर ओटीपी येऊन वायफाय सुविधा सुरु होते. ही सेवा ३० मिनिटे सुरु राहते. यापेक्षा जास्तकाळ वायफाय वापरायचा असल्यास तुम्हाला पैसे द्यावे लागतात. तसेच या वायफायचा स्पीडही फार कमी असतो.रेल्वे प्रवासी म्हणतात...रेल्वे स्थानकात रेल्वेची वायफाय सेवा आहे याबाबत माहिती आहे पण हे नेट स्लो असल्याने मोबाईलचे नेट वापरत आहे.- अभिजित गवई, प्रवासी

रेल्वे स्थानकात वायफाय सुरू आहे पण मोफत वायफायला धीम्या गतीने सुरू असते. पैसे देऊन वायफाय चांगले आहे. पण त्या वायफायला खर्च करण्यापेक्षा मोबाईल रिचार्ज परवडतो.- विवेक काटे, प्रवासीरेल्वे कर्मचारी म्हणतात...रेल्वे परिसरात काम करताना जास्त वेळ मोबाईल पाहत नाही. त्यामुळे मोबाईलचा डेटा शिल्लक राहतो त्यामुळे रेल्वेचे वायफाय वापरत नाही.- रेल्वे कर्मचारीहोय वायफाय सेवा सुरू आहे सुरुवातीला या वायफाय सेवेचा वापर केला पण तांत्रिक अडचणी येतात त्यामुळे मोबाईल नेट वापरत आहे.- रेल्वे कर्मचारी

टॅग्स :भारतीय रेल्वेवायफाय