Join us  

२४ विमान तिकिटे रद्द केल्याबद्दल ‘गोएअर’ला दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 6:07 AM

विनाकारण फ्लाइट रद्द केल्याने प्रवाशांची अडचण केल्याबद्दल, ग्राहक मंचाने गोएअरला विलेपार्लेच्या रहिवाशाला ९८ हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचे निर्देश नुकतेच दिले.

मुंबई : विनाकारण फ्लाइट रद्द केल्याने प्रवाशांची अडचण केल्याबद्दल, ग्राहक मंचाने गोएअरला विलेपार्लेच्या रहिवाशाला ९८ हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचे निर्देश नुकतेच दिले. या रहिवाशाने मुलीच्या विवाहासाठी अहमदाबादहून येणाऱ्या २४ पाहुण्यांची तिकिटे काढली होती. मात्र, ऐन वेळी फ्लाइट रद्द केल्याने त्यांची गैरसोय झाल्याबद्दल ग्राहक मंचाने गोएअरने सेवेत कसूर केल्याचे म्हटले.जयेश पांड्या यांनी मे, २०१४ मध्ये मुलीच्या विवाहासाठी अहमदाबादहून मुंबईला १७ फेब्रुवारी, २०१५ रोजी येणाºया पाहुण्यांसाठी गोएअर विमानाची २४ तिकिटे खरेदी केली. त्यासाठी ५० हजार रुपये खर्च केले. विमानाच्या लँडिंग वेळेनुसार विवाहाची पूजा ठेवली. दरम्यान, प्रवाशांच्या नावांची यादी देण्यासाठी जानेवारी, २०१५ मध्ये त्यांनी गो-एअरलाइन्सशी संपर्कही केला. त्यानंतर, त्यांनी ही फ्लाइट रद्द केल्याचे पांड्या यांना सांगितले. त्यामुळे पांड्या यांना ऐन वेळी अधिक पैसे खर्च करून अन्य विमानसेवेची २४ तिकिटे काढावी लागली. तिकिटाची रक्कम परत मागितली असता गोएअरने ३,००० रुपयांचे क्रेडिट व्हाउचर दिले. त्यामुळे पांड्या यांनी तक्रार नोंदविली.आरटीआयच्या माहितीनुसार, त्या दिवशी गोएअरच्या विमानांच्या वेळांमध्ये बदल नव्हता. मात्र, गोएअरने ग्राहक मंचात ‘त्या’ दिवशी विमानांच्या उड्डाणांच्या वेळापत्रकात डीजीसीए आदेशानुसार बदल करण्यात आल्याचा खोटा दावा केला.>९८ हजारांची नुकसानभरपाईपांड्या यांचा युक्तिवाद मान्य करत, ग्राहक मंचाने गोएअरला तिकिटांचे ५० हजार रुपये तसेच अतिरिक्त नुकसानभरपाई म्हणून एकूण ९८,००० रुपये देण्याचे आदेश दिले.