Join us

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे आता प.रे. रखडली

By admin | Updated: April 10, 2015 10:33 IST

पश्चिम रेल्वेवरील सिग्नल यंत्रणा बिघडल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली असून चर्चगेटच्या दिशेने जाणा-या गाड्यांवर त्याचा परिणाम झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे कालच मध्य रेल्वेचा बो-या वाजलेला असतानाच आज पश्चिम रेल्वेची वाहतूक रखडली आहे. पश्चिम रेल्वेवरील सिग्नल यंत्रणा बिघडल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली असून चर्चगेटच्या दिशेने जाणा-या गाड्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. लोकल २० ते २५ मिनिटे उशीराने धावत असून कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. गाड्या लेट असल्याने सर्व लोकल्समध्ये प्रचंड गर्दी झाली असून रेल्वे स्थानकांवरही प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.