कल्याण : येथील बेतुरकरपाडा परिसरात असलेल्या काळातलावात बुडून दुर्गेश सोनी या १०वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ७च्या सुमारास उघडकीस आली. दुर्गेश हिंदी शाळेत सहावी इयत्तेत शिकत होता. शाळा सुटल्यानंतर तलाव परिसरात तो फिरण्यासाठी आला होता. सायंकाळी ७च्या सुमारास त्याचा मृतदेह तलावाच्या पाण्यात तरंगताना आढळला. अखेर, अग्निशामक दलाने त्याचा मृतदेह तलावाबाहेर काढला. या घटनेची नोंद एमएफसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. केडीएमसीने या तलावाच्या सुरक्षेसाठी पाच सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. तरीही ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
काळात लावात बुडून मुलाचा मृत्यू
By admin | Updated: July 6, 2015 02:58 IST