Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील दोघांचा नदीत बुडून मृत्यू

By admin | Updated: May 8, 2017 04:10 IST

कोर्ले (ता. लांजा) येथे लग्नाची फोटोग्राफी करण्यासाठी मुंबईहून आलेल्या दोन युवकांचा नदीच्या पात्राचा अंदाज न आल्याने

लोकमत न्यूज नेटवर्कलांजा (जि. रत्नागिरी) : कोर्ले (ता. लांजा) येथे लग्नाची फोटोग्राफी करण्यासाठी मुंबईहून आलेल्या दोन युवकांचा नदीच्या पात्राचा अंदाज न आल्याने बुडुन मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी सकाळी घडली. बंडू रमेश जाला (१९) व मुकेश पालाजी मकवाणा (३२, दोघेही जोगेश्वरी, मुंबई) अशी त्यांची  नावे आहेत. कोर्ले येथे सोमवारीहोणाऱ्या लग्न सोहळ््याचे  फोटो काढण्यासाठी बंडू,  मुकेश, अल्पेश परमार व रणजित  रॉय हे येथे आले होते. चौघेजण मुचकुंदी नदीवर पोहण्यासाठी  गेले होते.  संगमेश्वरमध्ये एकाचा बुडून मृत्यू येगाव (ता. संगमेश्वर) येथे रविवारी सकाळी सुनिल भागूराम पवार यांचा गडनदीत बुडून मृत्यू झाला. पवार हे भाचीच्या लग्नासाठी येगाव येथे आले होते.