ठाणे : तरण तलावात बुडाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. पहिल्या घटनेत येथील वसंत विहार क्लब हाऊसमधील तरण तलावात पोहतांना ऋषभ वेदपाठक या ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. याठिकाणी जीवरक्षक विनोद सोनावणे हा उपस्थित असूनही त्याने या घटनेकडे दुर्लक्ष केल्याने त्याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना ७ मे रोजी सायंकाळी ६ वा. च्या सुमारास घडली़ दुसर्या घटनेत काल्हेर शहरातील कासारआळी येथे राहणारे राजेंद्र वसंत चौधरी (४८) हे आपल्या नातेवाईक व मुलाला घेवून तरण तलावात पोहण्यासाठी शनिवारी सकाळी १० वा. गेले असताना नाकातोंडात पाणी जावून त्यांचा मृत्यू झाला. हा तरण तलाव हे ३० वर्षे करारावर भिवंडी महापालिकेने प्रोटिव्ह फिटनेस सेन्टर -भिवंडी यांना योग्य त्या अटी-शर्तीवर चालविण्यास दिले आहे. मात्र तलावात पोहण्यासाठी येणार्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे जीवन रक्षक नसल्याने सुरक्षितेची साधने पुरवली नाही व क्षमतेपेक्षा जास्त लोकांना प्रवेश दिला व निष्काळजीपणाचे कृत्य केल्याने राजेंद्र चौधरी यांचा मृत्यूस कारणीभूत झाला म्हणून तरण तलावाचे चेअरमन रेहान अनिश मोमीन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
तरण तलावात बुडून दोघांचा मृत्यू
By admin | Updated: May 13, 2014 22:36 IST