Join us

सीएसटीजवळ मालगाडीचा घसरलेला डबा हटवला, वाहतूक सुरु

By admin | Updated: February 5, 2016 10:43 IST

र्बरलाईन मार्गावरील सीएसटी-मस्जिद बंदर रेल्वे स्थानकां दरम्यान घसरलेला मालगाडीचा डबा रुळावरुन हटवण्यात आला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ५ - हार्बरलाईन मार्गावरील सीएसटी-मस्जिद बंदर रेल्वे स्थानकां दरम्यान घसरलेला मालगाडीचा डबा रुळावरुन हटवण्यात आला असून, या मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. 
पहाटे चारच्या सुमारास खडी वाहून नेणारा मालगाडीचा डबा घसरल्यामुळे वडाळा-सीएसटी दरम्यान दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. कालही हार्बर मार्गावर वडाळा-सीएसटी दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने सीएसटीच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली होती. 
सध्या हार्बर मार्गावर फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. त्यासाठी रोज रात्री मेगा ब्लॉक घेऊन काम सुरु असते. त्या दरम्यान ही घटना घडली. 
सलग दुस-या दिवशी ऐन कामावर जायच्या वेळी हार्बर रेल्वे विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. हार्बरच्या प्रवाशांना मध्यरेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली असून, बेस्टलाही अधिक गाडया सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.