Join us  

समुद्री वारे स्थिर होण्यास विलंब होत असल्याने मुंबई तापली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 4:30 AM

हवामान खात्याची माहिती; उस्मानाबाद येथे सर्वांत कमी तापमान

मुंबई : समुद्राहून मुंबईकडे वाहणारे वारे हे सकाळीच स्थिर होतात. मात्र, हे वारे स्थिर होण्यास दुपार उलटली की, मात्र ते तापतात. सध्या मुंबईत अशीच काहीशी स्थिती आहे. कारण समुद्राहून मुंबईकडे वाहणारे वारे दुपारी स्थिर होत आहेत. परिणामी, कमाल तापमानातही वाढ नोंदविण्यात येत असून, दिवसागणिक मुंबईकरांना बसणारे उन्हाचे चटके वाढतच आहेत.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान उस्मानाबाद येथे १०.४ अंश नोंदविण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली, तर उर्वरित भागांत लक्षणीय घट झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.दरम्यान, राज्यातील बहुतांश शहरांच्या कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असतानाच, दुसरीकडे काही ठिकाणी किमान तापमानात घट नोंदविण्यात येत आहे. विदर्भाच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात येत असून, मुंबईचे किमान तापमानदेखील २० अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असल्याने, मुंबईकरांना पहाट किंचित का होईना पण गारव्याची अनुभूती देत आहे. कमाल तापमानाचा पारा ३५ अंश असल्याने दिवस तापदायक ठरत आहे. बुधवारी मुंबईचे कमाल तापमान ३६.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले.विदर्भात पाऊस२७ ते २८ फेब्रुवारी : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात येईल.२९ फेब्रुवारी : मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.१ मार्च : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.मुंबईत आकाश राहणार निरभ्रगुरुवारसह शुक्रवारी आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३८, २३ अंशांच्या आसपास राहील.बुधवारचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)मुंबई २१.८, पुणे १२.२, अहमदनगर १४.७, जळगाव १२.४, महाबळेश्वर १४.५, मालेगाव १३, नाशिक १२.८, उस्मानाबाद १०.४

टॅग्स :तापमान