Join us

चिमुरडीमुळे आईवरील अतिप्रसंग टळला

By admin | Updated: October 29, 2014 08:45 IST

सकाळी सातच्या सुमाराची घटना.. महिलेचा पती मॉर्निग वॉकसाठी घराबाहेर गेला होता. तेव्हा दरवाजा अर्धवट उघडा असल्याची संधी साधून एका नराधमाने घरात प्रवेश केला.

मनीषा म्हात्रे - मुंबई
सकाळी सातच्या सुमाराची घटना.. महिलेचा पती मॉर्निग वॉकसाठी घराबाहेर गेला होता. तेव्हा दरवाजा अर्धवट उघडा असल्याची संधी साधून एका नराधमाने घरात प्रवेश केला. दरवाजाची आतून कडी लावली. त्यात चिमुरडीच्या आईला जाग आली आणि नराधमाच्या हातातील सुरा बघून तिने एकच ओरड दिली. काही समजण्याच्या आतच त्याने महिलेच्या पोटाला सुरा लावला. नराधम आईला मारेल, या भीतीने मुलीने संधी साधून घराची कडी उघडली.. तोच शेजा:यांनी घराकडे धाव घेत नराधमाच्या तावडीतून या महिलेची सुटका केली. चित्रपटाची 
कथा वाटणारी ही घटना 
प्रत्यक्षात मुलुंडमधील एका चाळीत घडली आहे. 
मुलुंड पश्चिमेकडील विजयनगर परिसरात एक 24 वर्षीय  महिला पती आणि आपल्या दोन मुलींसोबत  राहण्यास आली होती. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास गीताचा पती घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवून मॉर्निग वॉकसाठी घराबाहेर पडला. गीता आपल्या दोन मुलींसोबत झोपली असताना एका नराधमाने ती एकटी असल्याची संधी साधून घरात प्रवेश केला. आणि आतून कडी लावली. कडी लावण्याच्या आवाजाने गीता जागी झाली, तिला काही समजण्याच्या आतच त्याने स्वयंपाकघरातील सुरा तिच्या पोटाजवळ धरला आणि तिला विवस्त्र होण्यास सांगितले. 
सुरा पाहून घाबरलेल्या गीताने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. गीताच्या आवाजाने तिची चार वर्षाची चिमुकलीही जागी झाली. जयपालने या चिमुरडीलाही दम भरला. मात्र आईचा जीव धोक्यात असल्याचे पाहून या चिमुरडीने कसलीही भीती न बाळगता तातडीने पळत जाऊन घराची कडी उघडली. तोर्पयत घराबाहेर जमलेल्या स्थानिकांनीही घरात धाव घेत नराधमाच्या मुसक्या आवळून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. चिमुरडीच्या या प्रसंगावधानामुळे महिलेवरील अतिप्रसंग टळला.  
 
च्मुलुंड पश्चिमेकडील विजयनगर परिसरात एक 24 वर्षीय  महिला पती आणि आपल्या दोन मुलींसोबत  राहण्यास आली होती. एका नराधमाने ती एकटी असल्याची संधी साधून घरात प्रवेश केला. स्वयंपाकघरातील सुरा तिच्या पोटाजवळ धरला आणि तिला विवस्त्र होण्यास सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्याखाली नराधमास अटक केल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी दिली.