Join us
Daily Top 2Weekly Top 5

मद्याच्या नशेत पोलिसाला मारहाण

By admin | Updated: February 14, 2016 02:30 IST

मद्याच्या नशेत काँग्रेस पदाधिकाऱ्याने गस्तीवरील पोलीस हवालदाराला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मलबार हिलमध्ये घडली. या प्रकरणी मलबार हिल विधानसभा

मुंबई : मद्याच्या नशेत काँग्रेस पदाधिकाऱ्याने गस्तीवरील पोलीस हवालदाराला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मलबार हिलमध्ये घडली. या प्रकरणी मलबार हिल विधानसभा युवक काँग्रेसचा महासचिव अर्जुन जाधव (२५) याला अटक करण्यात आली आहे.मलबार हिल पोलीस ठाण्यात बीट मार्शल असलेले विष्णू वसंत सागवेकर हे शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास नेपिएन सी रोड परिसरात गस्त घालत होते. या वेळी मद्याच्या नशेत उभ्या असलेल्या जाधव याला त्यांनी हटकले. त्याचात राग मनात धरत त्याने सागवेकरांसोबत वाद घातला आणि मारहाणही केली. घटनेची माहिती मिळताच येथे मलबार हिल पोलीस दाखल झाले आणि त्यांनी जाधवच्या मुसक्या आवळल्या. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे मलबार हिल पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)