Join us
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग तस्कर टॅक्सी चालकाचा आलिशान फ्लॅट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:08 IST

एनसीबीचे छापे : पाच जणांना अटकमुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने २४ तासांत केलेल्या वेगवेगळ्या तीन कारवायांत ५ जणांना ...

एनसीबीचे छापे : पाच जणांना अटक

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने २४ तासांत केलेल्या वेगवेगळ्या तीन कारवायांत ५ जणांना अटक केली आहे. यातील एक आराेपी टॅक्सीचालक असून त्याचा नाथानी हाईट्समध्ये आलिशान फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे.

पहिल्या कारवाईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) सुनील गवई या तस्कराकडून १ किलो २५० ग्रॅम गांजा जप्त केला आहे, तर दुसऱ्या कारवाईत नवाब शेख आणि फारुख चौधरीला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एलसीडी जप्त केल्या. नवाब हा टॅक्सीचालक आहे. तो मुंबईत टॅक्सी चालवतो. त्याचा नाथानी हाईट्समध्ये आलिशान फ्लॅट आहे. तो दिवसभर टॅक्सी चालवून बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना ड्रग्जची विक्री करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

तिसऱ्या कारवाईत केरी केलवीन मेनडेस्वास याच्याकडून गांजा जप्त करण्यात आला. त्याच्यासह नेल डीसिल्वा आणि अहमद शेख साजीत यालाही अटक करण्यात आली आहे.