Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षांमध्ये हवी ड्रायव्हर इन्फॉर्मेशन डिस्प्ले सिस्टीम

By admin | Updated: August 16, 2014 00:33 IST

ठाण्यात रिक्षाचालकापासून सुटका करून घेण्यासाठी स्वप्नाली लाड या तरु णीने धावत्या रिक्षामधून उडी मारून स्वत:चा जीव धोक्यात टाकला

नांदिवली : ठाण्यात रिक्षाचालकापासून सुटका करून घेण्यासाठी स्वप्नाली लाड या तरु णीने धावत्या रिक्षामधून उडी मारून स्वत:चा जीव धोक्यात टाकला. घटनेनंतर त्या रिक्षाचालकाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही. ही गंभीर बाब लक्षात घेता बंगळुरूमधील रिक्षांत आॅटो रिक्षा ड्रायव्हर इन्फॉर्मेशन डिस्प्ले सिस्टीम ओळखपत्र लावणे अत्यावश्यक आहे़ त्या धर्तीवर कल्याण-डोंबिवली शहरांत सुमारे १० हजार रिक्षांत ही प्रणाली लागू करण्याची मागणी आहे. बंगळुरूमध्ये ज्या प्रकारे रिक्षांमध्ये रिक्षाचालकाच्या सीटमागे म्हणजे प्रवासी बसतात, त्या सीटसमोर रिक्षाचालकाचा फोटो, त्याचा पत्ता, मोबाइल नंबर, लायसन नंबर, बॅच नंबर, रक्तगट, परवाना, परमिट नंबर, पोलिसांचा नंबर, संकटसमयी संपर्क नंबर या ओळखपत्रावर असेल. कल्याण-डोंबिवलीत अशी डिस्प्ले सिस्टीम सुरू करण्याची मागणी आहे.