Join us

‘पेयजल’ कागदावरच

By admin | Updated: January 24, 2015 22:52 IST

सुमारे ४० टक्के पेक्षा कमी पाणीपुरवठा होणाऱ्या तालुक्यांची तहान भागविण्यासाठी जिल्हा परिषदेने राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यात ६६१ कामांना मंजुरी दिली आहे़

अजित मांडके ल्ल ठाणेसुमारे ४० टक्के पेक्षा कमी पाणीपुरवठा होणाऱ्या तालुक्यांची तहान भागविण्यासाठी जिल्हा परिषदेने राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यात ६६१ कामांना मंजुरी दिली आहे़ ठाणे जिल्ह्यातील ३२ तर पालघरमधील केवळ ३८ कामे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे ठाण्यातील ७९ कामे आजही अपूर्ण आहेत. तर पालघर जिल्ह्यातील तब्बल १५८ कामे कागदावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कामांसाठी २२ कोटी ७० हजार रु पये खर्च होणार आहे. पाच तालुक्यामध्ये ही योजना हाती घेतली आहे. ज्या गावांमध्ये ४० लीटर पेक्षा कमी पाणीपुरवठा होतो. अशा गावांचा आराखडा तयार करून त्या त्या गावांच्या ग्रामसभेच्या माध्यमातून ती राबविण्यात येत आहे. त्यानुसार ठाणे जिल्हा परिषदेने एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीसाठी १८३ गावांमध्ये हा उपक्र म राबविण्यास मंजुरी दिली आहे. त्यातच ८० ठिकाणी हा उपक्र म राबविण्याचे उद्दीष्ट चालू वर्षात देण्यात आले आहे. त्यापैकी डिसेंबर २०१४ अखेर पर्यंत ३२ कामे पूर्ण करण्यात आली आहेत़ मार्च २०१५ अखेरपर्यंत ७९ कामे पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी ७ कोटी ७० लाखांचा खर्च येणार आहे.