Join us
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांची दहशत!

By admin | Updated: April 24, 2015 22:44 IST

तालुक्यातील खुटारी गावात एका तीन वर्षीय चिमुरडीला मोकाट कुत्र्याने चावल्याने त्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असून तालुक्यातील शिरवली गावात

पनवेल : तालुक्यातील खुटारी गावात एका तीन वर्षीय चिमुरडीला मोकाट कुत्र्याने चावल्याने त्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असून तालुक्यातील शिरवली गावात एकाच घरातील चौघांना मोकाट कुत्रा चावल्याचे समोर आले आहे. त्यात १७ वर्षीय सोनाली शांताराम दुर्गे ही मुलगी कुत्रा चावल्याने गंभीर जखमी झाली आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यात भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण कोणाचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिरवली गावात घराजवळ थांबलेल्या या मुलीच्या अंगावर अचानक कुत्र्याने उडी मारत या मुलीचा लचका तोडला. या हल्ल्यात मुलीच्या गालावर गंभीर दुखापत झाली आहे. भटक्या कुत्र्याच्या या हल्ल्यात नामदेव दुर्गे (६५), अनिल पाटील (३0), लीलाबाई पाटील (६0) हेही जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले.यात जखमी मुलीला उपचारासाठी पनवेलमधील ग्रामीण रु ग्णालयात दाखल केल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे निरीक्षक डॉं. बी. एस. लोहारे यांनी दिली. ग्रामीण भागात कुत्र्यांच्या हल्ल्यांचे प्रकार वाढत चालले आहेत. (वार्ताहर)