Join us

राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:07 IST

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मागील काही दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट झाली असून मृत्यूंचे प्रमाणही ...

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मागील काही दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट झाली असून मृत्यूंचे प्रमाणही कमी झाले आहे. राज्यात सोमवारी १०,२१९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५४ मृत्यू झाले आहेत. राज्यात सध्या १,७४,३२० सक्रिय रुग्ण असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात २१,०८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ५५,६४,३४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२५ टक्के, तर मृत्युदर १.७२ टक्के आहे. राज्यात १२,४७,०३३ व्यक्ती होमक्वारंटाइन तर ६,२३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,४२,००० झाली आहे. राज्यात कोरोनाने आतापर्यंत १ लाख ४७० रुग्णांचा बळी घेतला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६६,९६,१३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.९२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यातील ३० जिल्ह्यात सोमवारी एकही दैनंदिन मृत्यूची नोंद झालेली नसल्याचे दिसून आले.

जिल्हा सक्रिय रुग्ण

मुंबई - १७५११

ठाणे - १६६५५

पुणे -१९६४५

कोल्हापूर -१८५२०

सातारा- १३६०२