Join us

डॉ. मनीष त्रिपाठीच्या भावाला पोलिसांची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:06 IST

कांदिवली बोगस लसीकरण; वकिलांची उच्च न्यायालयात तक्रार, व्हिडीओ व्हायरललोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कांदिवली बोगस लसीकरणातील प्रमुख आरोपी ...

कांदिवली बोगस लसीकरण; वकिलांची उच्च न्यायालयात तक्रार, व्हिडीओ व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कांदिवली बोगस लसीकरणातील प्रमुख आरोपी डॉ. मनीष त्रिपाठी याच्या नातेवाइकांना पोलीस त्रास देत असल्याचा आरोप त्याच्या वकिलांनी केला आहे. याबाबत उच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली असून, मारहाण झालेल्या तरुणाचा व्हिडिओही त्यांनी प्रसारमाध्यमांत व्हायरल केला आहे.

कांदिवलीतील हिरानंदानी हाउसिंग सोसायटीत बोगस लसीकरण प्रकरणी डॉ. मनीष त्रिपाठी हा प्रमुख आरोपी असून, सध्या ताे पसार आहे. डॉ. त्रिपाठी याचे वकील ॲड. आदिल खत्री यांनी बुधवारी उच्च न्यायालयात कांदिवली पोलिसांविरोधात एक तक्रार दाखल केली आहे. ॲड. खत्री यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, डॉ. त्रिपाठी याचा भाऊ अनुराग याला मंगळवारी रात्री उशिरा कांदिवली पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेऊन बेदम मारहाण केली. अनुरागचा व्हिडिओही त्यांनी पत्रकारांना दिला.

डॉ. त्रिपाठी यांच्या वतीने मंगळवारी ॲड. खत्री यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. ज्यावर २५ जून, २०२१ रोजी सुनावणी होणार आहे. त्याच कारणामुळे पोलिसांनी हा प्रकार केल्याचा ॲड. खत्री यांचा आरोप आहे. या प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांना फोन आणि मेसेजमार्फत विचारणा केली असता त्यांनी उत्तर देणे टाळले.

........................................