मुंबई : डॉ़ होमी भाभा यांचा बंगला हेरिटेज घोषित करणो शक्य नसल्याचा दावा राज्य हेरिटेज समितीने केला आह़े तर केंद्र सरकारने ही वास्तू शंभर वर्षे जुनी नसल्याचे सांगून या बंगल्याचे म्युङिाअम करण्यापासून हात झटकले आहेत़ त्यामुळे उच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र व राज्य सरकारला या बंगल्याचे राष्ट्रीय स्मारक अथवा म्युङिाअम करण्याबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी अंतिम सहा महिन्यांची मुदत दिली़
डॉ़ भाभा यांचे अणू क्षेत्रतील योगदान येणा:या पिढीलाही कळावे यासाठी त्यांच्या बंगल्याचे म्युङिाअम करावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका प्रशांत वरळीकर व इतरांनी अॅड़ विक्रम वालावलकर यांच्यामार्फत केली होती़ मात्र ही वास्तू शंभर वर्षे जुनी नसल्याने याबाबतचा निर्णय राज्य सरकारच घेऊ शकते, असा दावा केंद्र सरकारने केला़ तर ही वास्तू हेरिटेज करणो शक्य नसल्याचे राज्य हेरिटेज समितीने स्पष्ट केले आह़े त्यामुळे यासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे राज्य शासनाने न्यायालयाला सांगितल़े ते ग्राह्य धरीत मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठाने ही सर्व कागदपत्रे केंद्र सरकारकडे सादर करण्याचे आदेश वरळीकर यांना दिले व याचिका निकाली काढली़ (प्रतिनिधी)
च्डॉ. होमी भाभा यांचा बंगला शंभर वर्षे जुना असल्याची सर्व कागदपत्रे आपल्याकडे असल्याचे प्रशांत वरळीकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणल़े