Join us  

अपंगत्वावर मात करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 6:55 PM

डॉ. बत्राज मल्टी स्पेशियालिटी होमिओपथी एक असा ब्रँड आहे जो वैद्यकिय सेवा देण्यासोबतच सामाजिक उपक्रमांमध्येही सहभाग घेत असतो.

डॉ. बत्राज मल्टी स्पेशियालिटी होमिओपथी एक असा ब्रँड आहे जो वैद्यकिय सेवा देण्यासोबतच सामाजिक उपक्रमांमध्येही सहभाग घेत असतो. डॉ. बत्राज हेल्थ अवॉर्ड्सचा 12वा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यामध्ये धैर्य आणि चिकाटीच्या जोरावर आपल्या अपंगत्वावर मात करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. 

या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये भाषण करताना पद्मश्री विजेते डॉ. मुकेश बत्रा, फाउंडर अॅन्ड चेअरमन एमेरिट्स, डॉ, बत्राज् ग्रुप ऑफ कंपनीज् यांनी सांगितले की, '40 वर्षांहून जास्त काळ डॉक्टर म्हणून काम करत असताना मी अपंगत्वाशी लढत असलेल्या लोकांचा संघर्ष मी प्रत्यक्ष पाहिला आहे. मला असा विश्वास वाटतो की, या व्यक्ती समाजातील इतर व्यक्तींसाठी नेहमीच आदर्श ठरतात.'

राजीव बजाज, एम डी बजाज ऑटो म्हणाले की, 'डॉ बत्राज् पॉझिटिव्ह हेल्थ अॅवॉर्ड्ससोबत संबंध असणं ही माझ्यासाठी फार अभिमानाची बाब आहे. माझा स्वतःचा होमिओपथीच्या शास्त्रावर विश्वास आहे. डॉ. बत्रा वैद्यकिय क्षेत्रात जे काम करत आहेत ते नक्कीच उल्लेखनिय आहे.' 

मानवाच्या जिद्दीचा विजय साजरा करताना बजाज व्हि. यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या डॉ. बत्राज् पॉझिटिव्ह हेल्थ अवॉर्डद्वारे अशा सहा धैर्यवान व्यक्तींना सन्मानित केले ज्यांनी आपल्या सर्व अडचणींवर मात करत सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. या प्रतिष्ठीत पुरस्काराचा वितरण सोहळा 27 नोव्हेंबर 2018 रोजी भव्य रॉयल पॅलेस ऑपेरा हाऊस, मुंबई येथे पार पडला. या प्रसंगी शुत्रुघ्न सिन्हा, झायेद खान, डॉलि बिंन्द्रा, मधु शहा, अनु मलिक, रोहित रॉय, शेखर सुमन, राकेश बेदी यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.