Join us
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूत विद्यार्थिनीवर बलात्कार;आरोपी फरार

By admin | Updated: March 1, 2015 23:05 IST

येथील चौदा वर्षाची विद्यार्थीनी घरी जात असतांना तिला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून जंगलात नेऊन आकाश रघुनाथ वनगा

डहाणू : येथील चौदा वर्षाची विद्यार्थीनी घरी जात असतांना तिला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून जंगलात नेऊन आकाश रघुनाथ वनगा (रा. सरावली नाईकपाडा ) याने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना शनिवारी घडली. याबाबत आशागड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शाळा सुटल्यानंतर मैत्रिणीसोबत सायकलवरून घरी जात असताना त्याने मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग केला. त्यांना वाटेतच थांबवून या मुलीला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून जवळच्या चरी येथील झाडी-झुडपात नेऊन बलात्कार केल्याचे पिडित मुलीने डहाणू पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले असून मुलीने दिलेल्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक रवी पाटील करीत असून आरोपीला अटक झालेली नाही.