हितेन नाईक - पालघर
मी डोलकर.. डोलकर.. डोलकर दर्याचा राजा.. असा दर्याचा राजा डोलकर मासेमारी बंदीच्या काळात समुद्रापासून दूर होता, मात्र 93 दिवसांच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर समुद्रात मासेमारीला जाण्यासाठी सातपाटी ते डहाणूर्पयतच्या मच्छिमारांनी तयारी सुरू केली आहे. नागपंचमीच्या शुभमुहूर्तापासून आपल्या लक्ष्मीरूपी बोटीची पूजा-अर्चा करीत जाळी व इतर मासेमारी साहित्य भरण्यास मच्छीमारांनी सुरूवात केली आहे.
मासेमारी अधिनियमानुसार 1क् जून ते 15 ऑगस्ट किंवा नारळी पौर्णिमा (जो दिवस पहिला येईल तो) या कालावधीमध्ये समुद्रात तुफानी वादळ, वारे, वाहत असल्याने राज्यशासनाने समुद्रातील मासेमारीवर बंदी घातली आहे. परंतु समुद्रातील मासेमारी करताना लहान पिल्लांसह गाबोळीधारक मासेमारीमुळे मत्स्यसाठयाच्या प्रमाणात मोठी घसरण होत चालली आहे. पालघर, डहाणू, वसई तालुक्यातील मच्छिमारांनी स्वयंस्फूर्तीने निर्णय घेत 15 मे पासूनच मासेमारी बंद ठेवली होती. या बंदीकालावधीत मच्छिमारांना मोठया आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागले होते, त्यामुळे मासेमारीला जाण्यासाठी मच्छिमार बांधवांसह महिलांचीही मोठी लगबग सुरू झाली आहे. नागपंचमीच्या शुभमुहुर्तावर महिलांनी हळद-नारळाची ओटीसह आपापल्या बोटीची विधीवत पूजा करण्यास सुरूवात केली, तर पुरूषमंडळींनी आपापल्या बोटीत नवीन जाळी व तत्सम मच्छिमारी साहित्य भरण्यास सुरूवात केली आहे.
4इंजिनची चाचपणी, रंगरंगोटी व बोटीची टेस्ट ड्राईव्हही घेण्यात येणार असल्याचे मच्छिमार संतोष तरे यांनी सांगितले. सहकारी संस्थेच्या डिझेल पंपांना मत्स्यव्यवसाय विभागाकडून सील मारण्यात येते. हे सील काढल्यानंतर मच्छिमारांना डिझेल, ऑईल व बर्फाचे वाटप करण्यात येणार आहे, तर सातपाटीमधील साधारणपणो 25क् मच्छिमारी नौकांना 9क्क् टन बर्फ लागणार असून सातपाटीमधील सर्वोदय सहकारी संस्था व मच्छिमार सहकारी संस्थांनी 1 ऑगस्टपासूनच बर्फ उत्पादन काढायला सुरूवात केल्याचे संस्थेचे चेअरमन नरेंद्र पाटील यांनी लोकमतला सांगितले, मात्र विद्युतपुरवठा खंडीत होत असल्याने बर्फ उत्पादनात व्यत्यय होत असल्याचे एमडी सुभाष तरे यांनी सांगितले.