Join us

लोकलच्या गर्दीवर डबल डेकरचा उतारा

By admin | Updated: December 14, 2014 02:26 IST

मुंबई शहर सर्वात मोठय़ा लोकसंख्येचे शहर आहे. ही लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. हा बिकट प्रश्न असून यामुळे लोकलची गर्दीही वाढत आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंचा पर्याय : मुंबईतील वाढती लोकसंख्या हा बिकट प्रश्न  
मुंबई : मुंबई शहर सर्वात मोठय़ा लोकसंख्येचे शहर आहे. ही लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. हा बिकट प्रश्न असून यामुळे लोकलची गर्दीही वाढत आहे. या गर्दीवर तोडगा काढण्यासाठी मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गावर डबल डेकर लोकलचा पर्याय शोधत असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. तीन एक्स्प्रेस गाडय़ांना हिरवा ङोंडा दाखवतानाच दोन एक्स्प्रेस गाडय़ांची घोषणा रेल्वेमंत्री प्रभू यांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे शनिवारी केली. या कार्यक्रमादरम्यान डबल डेकरचा पर्याय शोधत असल्याचे ते म्हणाले. या वेळी वसई-रोड-दिवा-रोहा विभागातील नवीन डेमू ट्रेनचाही रिमोटद्वारे शुभारंभ त्यांनी केला. 
देशभरातील, राज्यातील आणि मुंबईतील अनेक भागांतून लोक येतात आणि उपनगरीय लोकल सेवेतून प्रवास करतात. मुंबईतील लोकसंख्या वाढत असून त्यामुळे लोकलची गर्दीही वाढत आहे. त्यामुळेच या उपनगरीय सेवेत सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत या वेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. लोकल सुधारणोसाठी प्रत्यक्षात गाडय़ा, रेल्वेरूळ आणि प्लॅटफॉर्म सुधारण्याची गरज असून, यासाठी एका अॅक्शन प्लॅनची गरज आहे आणि हा प्लॅनही आम्ही बनवत असल्याचे ते म्हणाले. लोकल सुधारणोसाठी, सोयीसुविधा पुरविण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सगळ्या यंत्रणांची एकत्रित बैठक घेणार आहोत. मुंबईतील लोकलसाठी सर्वागीण विकास आराखडाही तयार केला जात असून, त्यावर होणा:या बैठकीत चर्चा केली जाईल, असे प्रभू यांनी या वेळी सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईतील रस्त्यांवर प्रकल्प राबविण्यासाठी जागेची कमतरता भासत असून, लोकलसाठी एलिव्हेटेड कॉरिडोरचाही पर्याय उत्तम आहे. त्याचाही विचार केला जात असल्याचे ते म्हणाले. 
 
 
मुंबईत असणा:या उपनगरीय लोकल सेवेतूनही सर्वाधिक निधी रेल्वेला मिळत आहे. त्यामुळे या सेवेला सुधारण्यासाठी विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.