Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालिका मैदानाची दुरवस्था

By admin | Updated: October 13, 2016 04:20 IST

घाटकोपर बर्वेनगर परिसरातील दत्ता साळवी मैदानाकडे महापालिकेने दुर्लक्ष केले असून, मैदानात बांधण्यात आलेले स्टेडियम भंगार साहित्यांचे गोदाम

मुंबई : घाटकोपर बर्वेनगर परिसरातील दत्ता साळवी मैदानाकडे महापालिकेने दुर्लक्ष केले असून, मैदानात बांधण्यात आलेले स्टेडियम भंगार साहित्यांचे गोदाम झाले आहे. येथील खोल्यांमध्ये टाकाऊ साहित्य ठेवण्यात आले असून, मैदान गर्दुल्ल्यांचा अड्डा बनल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.घाटकोपर भटवाडी बर्वेनगर परिसरात दत्ता साळवी महापालिका मैदान आहे. हे मैदान मोठे असून, येथे काही वर्षांपूर्वी स्टेडियम उभारण्यात आले. पूर्वी या मैदानात खेळांचे सामने रंगत, पण आता गर्दुल्ले आणि पार्किंगची जागा म्हणून या मैदानाची ओळख झाली आहे. मैदानातील स्टेडियमची एकदाही डागडुजी करण्यात आलेली नाही. येथील एकही दिवा सुरू नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी गर्दुल्लांचा वावर वाढतो. मैदानात खासगी विकासकांकडून बांधकामाचे डेब्रिजही टाकले जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)